Ad will apear here
Next
... आणि शेतात पाणी झाले!
वॉटर कप स्पर्धेअंतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा उपयोग


सोलापूर :
यंदा सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात अत्यल्प पाऊस पडल्याने तो हंगाम वाया गेला आणि रब्बीही हातचा जाण्याची लक्षणे होती; मात्र कार्तिकी एकादशीच्या दरम्यान (१९-२० नोव्हेंबर २०१८) काही भागांत सलग दोन दिवस जोरदार पाऊस पडला. पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या मोडनिंब गावासह परिसरातील सोलनकरवाडी, लोंढेवाडी, बैरागवाडी व उपळाई बुद्रुक या सात गावांत मोठा पाऊस झाला. स्पर्धेअंतर्गत या गावांत केलेल्या जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी वाहून न जाता साठवले गेले. त्यामुळे माढा तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.     



खरीप हंगामाच्या पाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची बिकट परिस्थिती उभी ठाकलेली असताना माढा तालुक्यातील काही गावांमध्ये सलग दोन दिवस मोठा पाऊस पडला. चारा पिकांसह महत्त्वाच्या ज्वारी पिकाला या पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. नुकतीच दिवाळी झाली असली, तरी दुष्काळामुळे या भागात फारसा उत्साह नव्हता; मात्र पाऊस पडताच या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. 



या भागात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसामुळे शेतशिवारात पडलेले पाणी वाहून न जाता मोठ्या प्रमाणात जमिनीतच मुरले. त्याचा उपयोग परिसरातील विहिरी, बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास होणार आहे. माढा तालुक्यातील २४ गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. त्यापैकी मोडनिंबसह परिसरातील सोलनकरवाडी, लोंढेवाडी, बैरागवाडी व उपळाई बुद्रुक या सात गावांत उत्लेखनीय कामगिरी झाली आहे. या गावांत नुकत्याच पडलेल्या पावसाचे पाणी वाहून न जाता जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे साठून राहिले. हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. मधल्या काळात जलसंधारणाची कामे होऊनही पाऊसच पडला नसल्यामुळे पाणी साठले नव्हते. त्यामुळे सहभागी लोकांमध्ये प्रचंड निराशा आली होती; मात्र पावसाने त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. 





याबाबत पाणी फाउंडेशनचे माढा तालुका समन्वयक राजकुमार माने यांनी समाधान व्यक्त करून, या पावसामुळे लोकांचा उत्साह वाढल्याचे सांगितले. अंदाजे वीस हजार टँकर्स एवढे पाणी या भागात मुरले असावे, असे त्यांनी सांगितले. ‘जलसंधारणाच्या कामांमुळे आता वन्य जीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे,’ असे दुसरे समन्वयक सुशांत गायकवाड यांनी सांगितले. 



जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे म्हणाल्या, ‘पाणी फाउंडेशनतर्फे झालेल्या वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाची चांगली कामे झाली; मात्र पाऊसच पडला नसल्यामुळे आमची चांगलीच निराशा झाली होती. या पावसामुळे आम्हाला आता प्रचंड आनंद झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेणार आहोत.’

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZPFBU
 बातमी छान कव्हरेज
उत्कृष्ट1
 या मीडिया च्या माध्यमातून आपण खूप चांगले जनसमुदायाने केलेले कामाचे कौतुक केले आहे व यामुळे अजून जास्तीत जास्त लोकांनी याची प्रेरणा घेऊन आपले।जंगल ,जमीन, पशु पक्षी याच्या साठी कामे करतील
धन्यवाद1
 माझी बहीण डाॕ निशिगंधा माळी व दाजी डाॕ प्रंशांत कोल्हे माळी यांनी पाणी फौंडेशनमध्ये खुप मोठे मोलाचे काम केले आहे .
 समाजहितासाठी खुप मोठे कार्य झाले आहे
 Chan
Similar Posts
‘माती, गवत, पीकनियोजनावर काम केल्यासच दुष्काळाला हरवणे शक्य’ पुणे : ‘पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट क्षेत्रात मोठे काम झाले आहे आणि लोकांमध्ये जागृती झाली आहे; मात्र त्यासोबतच आता माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावे लागणार आहे. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात केले
वॉटर कप स्पर्धेत सोलापूरची उत्तम कामगिरी सोलापूर : पानी फाउंडेशनच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या चौथ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी (ता. बार्शी) गावाला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तालुका पातळीवर मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर गावाने प्रथम, नंदेश्वरने दुसरा, तर डोंगरगावाने तिसरा क्रमांक मिळवला
‘जलसंधारण, पाणीबचतीवर भर देणे आवश्यक’ पुणे : ‘जलचक्रामधील एक अवस्था म्हणजे भूजल आहे. भूजलसाठे या नैसर्गिक संपत्तीला मर्यादा असून, त्यावर हवामान बदलाचा परिणाम होतो. भूजलाच्या नियोजन आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत खडकांच्या जलधारण क्षमतेचा अभ्यास करावा लागतो. शेती हा भूजलाच्या वापरामध्ये सर्वात मोठा भागधारक आहे. ६५ टक्के सिंचित क्षेत्र भूजलावर अवलंबून आहे
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language